IMD Rain Alert: मराठवाड्यासह विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा; आज कुठे-कुठे कोसळणार पाऊस? वाचा…

IMD Rain Alert: फेब्रुवारीच्या सुरुवातीला राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. याचा परिणाम होऊन अनेक भागांतून थंडी गायब झाली असून, सूर्यप्रकाश चमकू लागला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाली.

येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विदर्भात काही ठिकाणी जोरदार गारपीट आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला.(IMD Rain Alert)

हे पण वाचा: आता सरकार देत आहे शेतात पाईपलाईन करण्सायासाठी अनुदान, असा करा अर्ज (Pipeline Grant)

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत शनिवारी पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळीला शनिवारी दुपारी वादळी वाऱ्याने झोडपले. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुमारे 15 ते 20 मिनिटांत गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले.

आज या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

IMD Rain Alert दरम्यान, आजपासून राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा: आज राज्यात पेट्रोल व डीजेल महागलं,वाचा तुमच्या भागातील नवे भाव

याशिवाय विदर्भातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर येथे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.