Orchard Planting Scheme: या 15 फळ पिकांसाठी मिळतंय 2 लाखांपर्यंत अनुदान, पहा अशी आहे अर्ज प्रोसेस..

Orchard Planting Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत शेतातील बांधावर पडीक असलेल्या जमिनीवर फळबाग वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून 3 वर्षामध्ये 100 टक्के अनुदान मिळणार आहे. किनवट तालुक्यातील 88 शेतकऱ्यांनी एकूण 6.05 हेक्टर जमिनीवर तब्बल 58,627 विविध प्रकारच्या फळबागांची लागवड करून त्याचा लाभ या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबर फळबाग आणि लागवड करून खूप उन्नती साधावी त्यासाठी शासनद्वारे 100 टक्के अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे. अल्प व अत्यल्पभूधारक (पाच एकरांच्या आतील) शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (MREGS) व पाच एकरावर जमीन असणाऱ्या |शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना राबविली गेली आहे.Orchard Planting Scheme

कित्येक शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये लागवड करीत आहेत. राज्यात गेल्या तीन वर्षात दरवर्षी प्रत्येकी 60 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. लागवडीमध्ये मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्येक वर्षाला 40 हजार हेक्टरापेक्षा अधिक उद्दिष्टाच्या 80 किंवा 90 टक्क्यांपर्यंत फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे.

Orchard Planting Scheme Details In Marathi

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून फळबागांची लागवड करताना एप्रिल, किंवा मे महिन्यातच नियोजन करून खड्डे खोदले जातात. पावसाला सुरुवात झाली की, जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्तीत जास्त फळबागांची लागवड केली जात आहे ह्यावर्सी मात्र सुरुवातीलाच पाऊस पडला नाही. त्याचा लागवडीवर खूप जास्त प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत असून नांदेड जिल्ह्यात यावर्षी उद्दिष्टाच्या केवळ 33.87 टक्के लागवड झाली आहे.

यापैकी किनवट तालुक्यातील फळबाग योजने अंतर्गत 75 हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी किनवट तालुक्यामधील एकूण 210 शेतकऱ्यांनी अर्ज संमत करुन प्रशासकीय मंजूर प्राप्त केली होती. त्यापैकी प्रत्यक्षात 87 शेतकऱ्यांनी त्यांच्या 68.05 हेक्टर सलग जमिनीच्या क्षेत्रावर फळबागांची लागवड करण्याच्या उद्देशाने 58,627 खड्डे खोदून तितक्याच फळझाडांनची लागवड केली.

हे पण वाचा: ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर नाव पहा

यासोबत एका शेतकऱ्याने आपल्या एक हेक्टर शेताच्या बांधावर 20 फळझाडांची रोपे लावलेली आहेत. सलग क्षेत्रावर फळझाडांची लागवड झालेल्या क्षेत्रामध्ये आंबा 50.80 हेक्टर , सिताफळ 2 हेक्टर, पेरू 3 हेक्टर, कागदी लिंबू 1 हेक्टर, केळी 10.25 हेक्टर आणि मोसंबी 1 हेक्टर आणि एका शेतकऱ्यांने एक हेक्टर शेतातील बांधावरील फळझाडे मिळून सर्व 88 शेतकऱ्यांनी आपल्या 69 .05 हेक्टर जमिनीत तब्बल 58,625 उपरोक्त झाडांची लागवड केलेली आहे.

100% अनुदानावर फळबाग लागवड योजना :- अर्ज प्रोसेस..  

Orchard Planting Scheme आंब्याची कलम बाय मीटर अंतरावर हेक्टरी 400 झाडे लावण्याकरिता मजुरी व इतर सामुग्रीसाठी एकूण 2 लाख 33,973 रुपये अनुदान तीन वर्षामध्ये टप्याटप्याने प्राप्त होत असते.

याच धर्तीवर विविध अंतर व कलमांच्या संख्यनुसार पेरूसाठी 1 लाख 65,064 रुपये, मोसंबी कागदी लिंबूसाठी 1 लाख 93.124 रुपये, सीताफळासाठी 1 लाख 9 हजार 429 रुपये अनुदान प्राप्त होते. केळी या फळपिकांना यंदा या योजनेअंतर्गत समावेश केला असल्यामुळे अजून त्यासंदर्भात अनुदानाची माहिती प्राप्त झालेली नाही.