PM Kisan 16th Installment : याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6,000, यादीत आहे का तुमचे नाव

PM Kisan 16th Installment: पीएम किसान योजनेमार्फत लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये प्रतिवर्ष 6,000 रुपये जमा करण्यात येतात. मात्र या पैशाचा वापर शेतकरी नेमका कशासाठी करतात हे काही समोर येत नाही. त्यासाठी आता केंद्र शासनाने लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांची नावे किसान क्रेडिट कार्डशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी ई-केवायसी (ekyc) करणे आवश्यक आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan 16th Installment) योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KIsan Credit Card) योजनेशी जोडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्यासाठी कृषी समन्वयक आणि सेवा केंद्रावर तुम्हाला माहिती दिली जाईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही जोडणी (Attach) करण्यावर भर द्यावी. लवकरात लवकर दोन्ही योजना लिंक (link) करणे आवश्यक आहे. जर ही जोडणी केली नाही. तुमची केवायसी (kyc) अपडेट झाले नाही तर वर्षाला 6,000 रुपये मिळणाऱ्या सन्मान निधीवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागेल. यासंबंधीचे नियम कडक केले आहेत. अनेक शेतकरी याआधी पण केवायसी अपडेट न केल्याने यादी बाहेर गेले आहेत.(PM Kisan 16th Installment)

हे पण वाचा: सरसकट या लोकांना मिळणार 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार

कर्जाचा मिळेल फायदा

किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची सवलत मिळते. माफक दरामध्ये कर्ज घेता येते. अनेक शेतकरी या योजनेचा (Scheme) लाभ घेत आहेत. पण पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमधील सर्वच शेतकरी या योजनेमध्ये नाही. आता सरकारने सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या पीएम किसान (PM Kisan) योजनेमधील लाभार्थ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) नाही, त्यांना त्यासाठी अर्ज करुन दोन्ही योजनांची लिकिंग करणे आवश्यक आहे.

कधी जमा होणार 16 वा हप्ता (PM Kisan 16th Installment)

पीएम किसान (PM Kisan Scheme) योजनेमार्फत 15 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. आता या योजनेचा 16 हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या योजनेमार्फत फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अजून याची कुठेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

DBT माध्यमातून थेट लाभ

गेल्यावर्षी पीएम किसान योजनेचा ऑक्टोबर 2022 या कालावधीत 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 या कालावधीत 13 वा हप्ता जमा करण्यात आला. या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये केंद्र शासनाने 15 वा हप्ता जमा केला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्यांचे अंतर दिसून येत आहे. आता शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा लागलेली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांप्रमाणे वर्षाला एकूण 6,000 रुपये दिले जातात. DBT प्रकारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.