Senior Citizens मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, ज्येष्ठ नागरिकांना ३ हजाराचा अनुदान

Senior Citizens नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केली गेली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी वयोश्री योजनेला मंजुरी देत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणारी योजना सुरू केली आहे.

काय आहे वयोश्री योजना?

या योजनेंतर्गत वार्षिक २ लाख रुपये पर्यंत उत्पन्न असणारे ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत मिळणार आहे. याचा लाभ घेता येण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग केली जाणार आहे. योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना अपंगत्व व मानसिक अस्वास्थ्यापासून सुरक्षितता देण्याचा आहे.(Senior Citizens)

हे पण वाचा: Solar Pump Scheme: शेतकऱ्यांना सरकार देत आहे 95% अनुदानावर 3HP,5HP आणि 7.5HP सौर पंप, ऑनलाईन अर्ज सुरु…

या बरोबरच, योग व मनस्वास्थ्य केंद्रे स्थापन करून प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागात जिल्हाधिकारी व शहरी भागांत आयुक्ताकडून केली जाणार आहे. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणे व मानसिक व शारीरिक संरक्षण प्रदान करणे आहे.

योजनेचे अर्थसंकल्प

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, या योजनेसाठी ४८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे सव्वा ते दीड कोटी ज्येष्ठ नागरिकांपैकी, १५ लाखान्वर ज्येष्ठ नागरिकांना, जे विविध प्रकारच्या अपंगत्व व मानसिक अस्वास्थ्याने पीडित आहेत, याचा प्रत्यक्ष लाभ होईल.

हे पण वाचा: PM Kisan: योजनेच्या 16 व्या हफ्त्यात मिळणार 2000/- ऐवजी 3000/- रुपये यादीत नाव चेक करा

सर्वांगीण विकास

यापूर्वी केंद्राची वयोश्री योजना काही चुनिंदा जिल्ह्यात राबवली जात होती. मात्र आता मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारा राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या नागरिकांना समान विकासाचा लाभ देण्याचा यत्न केला जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक व आरोग्य संवर्धनात मोठे योगदान असेल.Senior Citizens